घर को स्वर्ग कैसे बनाये या विषयावर रविवारी विशेष प्रवचनाचे आयोजन

0
108
औरंगाबाद प्रतिनिधी  – श्री.१००८ पार्श्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वेरूळ येथे प.पु.आचार्य विदयासागरजी महाराज यांच्या उपवनातील सुगंधीत पुष्प प.पु.मुनिश्री दुर्लभसागरजी महाराज व मुनिश्री संधानसागरजी महाराज यांचा २०२३ चा ऐतिहासिक चातुर्मास सुरू असुन मुनिश्रीच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी भगवंताचा अभिषेक तदनंतर आहार चर्या, दुपारी ३ वाजता मुनिश्रींचे घर को स्वर्ग कैसे बनाये या विषयावर विशेष प्रवचन होणार आहे. तसेच संध्याकाळी ६ वाजता ध्यान धारणा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यकमासाठी राजाबजार, अरिहंतनगर, बालाजीनगर, सिडको, एन ९ येथुन मोफत बसेस ची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या बसेस सकाळी ११.३० वाजता निघणार आहेत. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी समाज बांधवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पार्श्श्वनाथ ब्रम्हचर्या आश्रम गुरâकुल व चातुर्मास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here