सुगंध दशमी निमीत्त राजाबजार जैन मंदिरात भगवंताला फुलाची चादर व धुप अर्पण सोहळ्यास हजारो
भाविकांची उपस्थिती
संयम हेच मनुष्य जीवनाची सार्थकता आ. डॉ. प्रणामसारगजी महाराज
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी श्री. खडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य डॉ. प्रणामसागरजी महाराज यांचा भक्तांबर प्रभावना चातुर्मास उत्साहात सुरु असुन त्यांच्या सानिध्यात आज सुगंधी दशमी व उत्तम संयम या दिवशी सकाळी भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान शैलेंद्र सेठी यांना मिळाला. तसेच सुगंधी दशमी निमीत्त शांतीधारेचा मान रमनलाल सचिन दर्शन कासलीवाल परिवार नांदगांववाला यांना मिळाला तर सुगंधी दशमी निमीत्त भगवंताला धुप व फुलाची चादर चढविण्याचा मान अभिषेककुमार सौ. शैलाजा तिलोकचंद चुडीवाल परिवार यांना मिळाला. तर हिराकाका प्रांगण येथे धुप चढविण्याचे सौभाग्य महावीरकुमार मिश्रीलाल स्वदेश ठोले यांना मिळाला.
आज सुगंध दशमी निमीत्त.संयम हेच मनुष्य जीवनाची सार्थकता
आपल्या गरजा सीमित करणे, मर्यादित ठेवणे, कुठे थांबायचे हे कळणे म्हणजेच संयम होय। संयम, सदाचार व चारित्र्यशिवाय मनुष्य पशुसमान आहे ।चारित्रहीन मनुष्याला योग्य अयोग्या चे ज्ञान होत नाही ।मनुष्य खूप शिकतो परंतु यथार्थ काय आहे हे जाणून घेण्यावर भर देत नाही ।सम्यक दर्शनाबरोबरच त्याने यथार्थ जाणले पाहिजे ।असंयमी मनुष्याला अज्ञानी, अशिक्षितच म्हणावे लागेल। संयम एक असा मुकुट आहे तो जगात कधीच कोणासमोर झुकत नाही ,त्याचा सर्वत्र आदर होतो ।धन, संपत्ती, वैभवचा विनाश झाला तरी नुकसान होत नाही। शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडले तरी थोडी हानी होते ।परंतु चारित्र्य नष्ट झाले तर आपल्या सर्वस्वाचा नाश होतो। म्हणून आपल्यात संयम, अनुशासन असणे खूप गरजेचे आहे। यातूनच चांगले चारित्र घडते ।आपले तन, मन,धन, स्वाभिमान सर्व काही देऊन संयम धर्माचे रक्षण करायलाच हवे। कारण तो असा धर्म आहे जो सदा सर्वकाळ आपल्या आत्म्याबरोबरच राहतो. कृतार्थ, सार्थक आणि समाधानी जीवनाकरिता नात्यातील परस्पर विश्वास, लज्जा, स्नेह ,सावधानी, आणि समाधान हिच पाच नैतिक बंधने अत्यावश्यक आहेत। आपण जगणार कसे यापेक्षा जगतो कसे याचा विचार करणे गरजेचे आहे। जीवनात संयमाचे रक्षण केले तर निश्चितच जीवनाची मोठी संपत्ती आपण कमावतो। जीवनाच्या सार्थकते बरोबरच आत्मकल्याणासाठी संयम धर्माचे सदैव पालन करून अपरिमित सुखाची उपलब्धी करावी। योग्य वेळी ब्रेक लावला नाही तर गाडीचा अपघात घडतो। त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या गाडीला इंद्रियाच्या, मनाच्या आणि वासनाच्या संयमाच्या ब्रेकची गरज आहे ।ज्याच्या अंगी संयमाचा गुण असतो समाधान त्याच्याकडे चालत येते। समाधानी व्यक्ती स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांचे जीवनही समृद्ध करते। आजच्या स्पर्धेच्या युगात हे मूल्य जपणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल।हीच मनुष्य जीवनाची सार्थकता प्रणामसागरजी महाराज यांच्या सानिध्यात हिराकाका प्रांगण पासुन राजाबजार जैन मंदिर, भाजी बजार जैन मंदिर, सवाईवाला जैन मंदिर, सराफा जैन मंदिर या मार्गाने शोभायात्रा काढुन भगवंताला धुप चढविण्यात आली. यावेळी पुरुष व महिला पांढ-या व केशरी रंगाच्या साड्या तसेच भक्तांबर प्रभावनाची टोपी घालुन लक्ष वेधत होते. यावेळी नमोकार भक्ती मंडळाचे शैलेश पहाडे, राजकुमार पांडे, आदी सदस्यांनी धार्मिक गिते गाऊन उपस्थिताची मने जिंकली.
संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत विश्श्वस्थ मंडळ व चातुर्मास समितीने परिश्रम घेतले. पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी पंचायत सचिव प्रकाश अजमेरा, किरण पहाडे, महावीर ठोले, यतीन ठोले, ललीत पाटणी, अरुण पाटणी, संतोष सेठी, जितेंद्र पाटणी, निता ठोले, चंदा कासलीवाल, चातुर्मास कमिटी अध्यक्ष अनिल कासलीवाल, डॉ. प्रकाश पापडीवाल, प्रसाद पाटनी अप्पु पाटणी, गुरु परिवाराचे सुनिल सेठी, काजु कासलीवाल, सागर पाटणी, विजय चांदीवाल, निलेश सेठी, श्रेणीक कासलीवाल, सुरेखा पाटणी, शैलेश पहाडे, राजकुमार पांडे, कांताबाई पहाडे, प्रमोद पांडे, रवि सेठी, संजय पहाडे, विपीन पांडे, रमेश पाटणी, मंजु ठोले, महावीर सेठी, पारस गोधा, संगीता सेठी, जयश्री गंगवाल, कपील भैया, आशा कासलीवाल, वृषभ कासलीवाल, शोभा लोहाडे, श्रीपाल लोहाडे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.