सिडको वाले बडे बाबा चरणी निर्वाण लाडू अर्पण

0
3

छत्रपतीसभाजीनगर प्रातिनीधी     सिडको  परिसरातील श्री कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर येथे चर्या शिरोमणी मुनिश्री प्रभाव सागरजी महाराज यांचे मंगल सानिध्यात तेवीसावे  तिर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला प्रथम शांतीधारा करण्याचा सन्मान श्री दिलीपराव बाबुसा साहुजी परिवार तथा द्वितीय शांतीधारा करण्याचे सौभाग्य कुमारी जिनीषा प्रशांत भाकरे प्रकाशजी भाकरे परिवार यांना प्राप्त झाले मुनिश्री चे पाद प्रक्षालन दिलीपराव बाबुसा साहुजी परिवार शास्त्र भेट करण्याचे तथा निर्वाण लाडू अर्पण करण्याचे सौभाग्य सौ मंगला दिगंबर क्षीरसागर यांना प्राप्त झाले.भगवान पार्श्वनाथ यांचे मोक्ष कल्याणक निमीत्ताने निर्वाण लाडू स्पर्धा घेण्यात आली यात वरिष्ठ गटात पहिला क्रमांक सौ संगीता संजयजी पाटणी द्वितीय क्रमांक सौ लता रत्नाकर अन्नदाते तृतीय क्रमांक सौ सविता प्रवीणजी गोसावी यांना मिळाला बाल गटात प्रथम क्रमांक कुमारी खुशी अनीलजी क्षीरसागर द्वितीय क्रमांक कुमारी मानसी सचीनजी बाळशेटे तृतीय क्रमांक कुमारी तनिष्का बाळशेटे यांना प्रदान करण्यात आला या विशेष कार्यक्रमात मुनिश्री नी मुकुट सप्तमी चे महत्व विषद केले वर्षात बारा सप्तमी येतात परंतु या सप्तमीला मुकुट सप्तमी हे विशेष नांव देण्यात आले कारण या पवित्र दिवशीच भगवान पार्श्वनाथ यांना मोक्षप्राप्ती झाली होती आजच्या दिवशी कुमारीका मुकुट सप्तमी व्रत घेऊन व उपवास करतात हे व्रत सप्त वार्षिक असतं या प्रसंगी कुमारीकांनी पुजन अष्टक केले यावेळी मुनिश्री नी आई वडील यांची आज्ञा ही मानलीच पाहिजे तसेच ब्रम्हचर्य हे विवाह होत नाही तोपर्यंत पाळलेच पाहिजे आपली नजर ही नासादृष्टी ठेवावी स्वजातीय मध्येच विवाह करील असा संकल्प करावा  आपल्या संस्कृती चा धर्माचा अवमान होईल असे कृत्य न करण्याचा सल्ला ही या प्रसंगी मुनिश्री नी दिला या कार्यक्रमाला मंदिर विश्वस्त अध्यक्ष अमोल मोगले, वर्धमान वायकोस, निलेश सावळकर,प्रकाश भाकरे,राजकुमार कुरकुटे, बाहुबली धोंगडे, रविंद्र सांगोले, शेखर वायकोस यांच्यासह दिगंबर क्षीरसागर धन्यकुमार वायकोस प्रकाश दलाल विलास जोगी दिपक वायकोस बाहुबली बोपलकर प्रभाकर गोमटे अशोक वायकोस संदिप वायकोस प्रवीण गोसावी जिवनधरजी कोरडे जिनगोंडा पाटील डॉ कुलभूषण कंडारकर पारोळा चोपडा येथील गुरू भक्त सुनील वायकोस सौ सविता गोसावी सौ अर्चना मोगले सौ विनिता जोगी सौ मंगला क्षीरसागर सौ संगीता पाटणी सौ भारती भाकरे  सौ मीनाताई साहूजी सौ संगीता बाळशेटे सौ मीना आहेरकर सौ संजीवनी बाळशेटे सौ सुनीता इंगलवार सौ सीमा वायकोस कुमारी श्रीया काळे कुमारी त्रिशा मोगले कुमारी जिनिषा भाकरे सौ ज्योती मोगले प्रगती महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यां आचार्य आर्यनंदि छात्रावास समिती व विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती प्रस्तावना अमोल मोगले व आभार विलास जोगी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here