श्री.१००८ वासुपुज्य जैन मंदिराचा ४ था स्थापना दिवस उत्साहात साजरा

0
2
छञपतीसंभाजीनगर प्रतिनीधी – श्री.१००८ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत श्री.१००८ वासुपुज्य खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर सेठीनगर जटवाडा रोड येथे मदिराच्या ४ था स्थापना दिवस निमीत्त्त विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम धर्मध्वजारोहनाने कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. तदनंतर भगवान वासुपुज्य यांचा दुध दही,केसर,सर्व औषधी व जल पुष्पाने भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी इंद्र इंद्राणी सौ.पुजा संतोष सेठी, दिलीप पन्नालाल सेठी, ताराचंद अजमेरा हे भगंताचे इंद्र इंद्राणी बनले होते.
यावेळी चेतन कासलीवाल कुशल अजमेरा, अमित साहुजी, जितेद्र कासलीवाल, अंकुश गंगवाल, प्रविण गंगवाल, विलास लुगाडे आदीनी भगवंताचा अभिषेक केला. यावेळी उपस्थित भाविकांना रितेश किरण पहाडे परिवाराच्या वतीने प्रसादी वाटण्यात आली. स्थापना दिवसा निमीत्त्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. तसेच यावेळी शांती मंत्राचे वाचन उषा दिलीप सेठी यांनी केले. संध्याकाळी आरतीने कार्यकमाची सांगता करण्यात आली. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here