सत्याचे पालन करण्यासाठी धैर्य, संयम व स्पष्ट वक्ते पणा आवश्यक – आ.डॉ.प्रणासागरजी महाराज

0
7
राजाबजार जैन मंदिरात राष्ट्रसंत तरूणसागरजी महाराज यांचा ७ वा समाधी दिवस साजरा.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – श्री.खडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांचा भक्तांबर प्रभावना चातुर्मास उत्साहात सुरâ असुन त्यांच्या सानिध्यात पर्युषण पर्वा निमीत्त्त विविध धार्मिक कार्यकंमाचे विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले असुन आज सर्वप्रथम सकाळी भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी शैलेद्र सेठी, शांतीधारा कर्ता प्रदिपकुमार अजितकुमार कैलासचंद सुनिल पाटणी परिवार यांच्या वतीने शांतीधारा करण्यात आली. तसेच आज राष्ट्रसंत तरâणसागरजी महाराज यांच्या ७ व्या समाधी दिवस निमीत्त्त फोटोला माल्यार्पन करण्याचे सौभाग्य बाहुबली चेतन गंगवाल परिवार यांना मिळाला. तसेच डॉ.प्रणामसागरजी महाराज यांच्या पादपक्षालनाचा मान डॉ.आशिषकुमार अशोककुमार पाटणी यांना मिळाला. तसेच विविध भक्तांकडुन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. आज उत्त्तम सत्य या दिवशी डॉ.प्रणामसागरजी महाराज यांनी उदबोधन करतांना सांगीतले की, सत्याचे पालन करण्यासाठी धैर्य, संयम व स्पष्ट वक्ते पणा आवश्यक आहे. सत्य हे कधी कधी कटु असते पण तेच दिर्घकाळ टिकणारे असते. सत्य मानव धर्माचे मुळ आहे सत्य बोलणार मनुष्य समाजात विश्श्वासार्ह ठरतो आणि आत्म्याचे शुध्दी साधतो. विश्श्वातील सर्वात मोठा चमत्कार सत्यच आहे असेही आचार्यश्रींनी सांगीतले व पुढे म्हणाले की, क्रांतीकारी राष्ट्रसंत तरâणसागरजी महाराज हे त्यांचे कडवे प्रवचन या व्याख्यानाव्दारे अतिशय प्रसिध्द होते. देशातील पंतप्रधान व राष्ट्रपती सोडुन दिल्लीतील लाल किल्यावर भाषण करणारे ते पहिले जैन मुनि होते. देशातील विविध राजकीय पक्षाचे व समाजाचे नेते समाधीस्त तरâणसागरजी महाराज यांचे आदर करत असत.
यावेळी कार्यकमाचे प्रास्ताविक पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले. यावेळी पंचायत सचिव प्रकाश अजमेरा, किरण पहाडे, महावीर ठोले, यतीन ठोले, ललीत पाटणी, निता ठोले, चंदा कासलीवाल,सतोश सेठी अरून पाटनी जितेंद्र पाटनी चातुर्मास कमिटी अध्यक्ष अनिल कासलीवाल, डॉ.प्रकाश पापडीवाल, अप्पु पाटणी, गुरâ परिवाराचे सुनिल सेठी, काजु कासलीवाल, सागर पाटणी, विजय चांदीवाल, निलेश सेठी,  समीर ठोले अमोल पाटणी, अशोक अजमेरा, पवन पाटणी, स्नेहल पहाडे, शुभम पांडे, मनि लोहाडे, अंकुर साहुजी, श्रेंंणीक कासलीवाल, सुरेखा पाटणी, शैलेश पहाडे, वैभव काला, राजकुमार पांडे, कांताबाई पहाडे, प्रमोद पांडे, रवि सेठी, संजय  पहाडे,  डी बी पहाडे रमेश पाटणी, मंजु ठोले,  बापु कासलीवाल आदीची मोठया संख्येने उपस्थिती होती. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here