संस्कार आणि संस्कृतीचे संवर्धन करतील मुली – उपाध्याय श्री विरंजन सागर जी महाराज

0
2
घरातील मुलगी जेव्हा शिक्षिका, डॉक्टर, संत किंवा सेविका बनते तेव्हा समाजाचा उत्थान होतो.उपाध्याय श्री विरंजन सागर जी महाराज
छत्रपती सभाजीनगर श्री 1008 मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर देशमुख नगर येथे  गर्ल्स करिअर काउन्सेलिंगचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुनिश्रींनी सांगितले की सर्जनाची शक्ती ही स्त्री आहे. आई आणि मुलगी या दोन्ही सर्जनशीलतेच्या प्रतीक आहेत. आई जीवनाला जन्म देते आणि मुलगी त्या परंपरेला पुढे नेत असते. मुलगी ही संस्कारांची वाहक असते व समाजात परिवर्तनाची प्रेरणा ठरते. मुलींनी नेहमी संस्कारित जीवन जगावे.
स्त्रीच्या पाच शक्ती असतात – सहनशीलता, कर्तृत्व, विनम्रता आणि नारीचे तीन रूपे – दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती भारतात कन्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे, पण आज काही मुली चुकीच्या संगतीत पडून पालकांचा आणि समाजाचा मान कमी करणारे पाऊल उचलतात. मुनिश्रींनी आवाहन केले की जीवनात पालकांचा मान उंचावा, पण असे कोणतेही कार्य करू नये ज्यामुळे त्यांचा मान खाली जाईल.
मुनिश्रींनी मुलींसाठी पाच सूत्रे दिली
आत्महत्या कधीही करू नये, संघर्षशील राहावे
सकारात्मक विचार ठेवावा
आपल्या ध्येयासाठी समर्पित राहावे
चुकीच्या संगतीपासून दूर राहावे
आरोग्य टिकवावे
मुनिश्रींनी सांगितले की अशा मुलींच्या संमेलनामुळे भावनिक बंध दृढ होतात, आत्मविश्वास वाढतो आणि सांस्कृतिक चेतना जागृत होते. मुली सकारात्मक असतील तर राष्ट्राचे भविष्य मजबूत होईल. घरातील मुलगी जेव्हा शिक्षिका, डॉक्टर, संत किंवा सेविका बनते तेव्हा समाजाचा उत्थान होतो. धार्मिक ग्रंथांमध्येही स्त्रीला श्रद्धा व शक्तीचे रूप म्हटले आहे.
यश मिळवण्यासाठी मुनिश्रींनी तीन सूत्रे दिली –
आपले लक्ष्य निश्चित करा
लगन व जिद्दीने कार्य करा
प्रयत्न सुरू ठेवा
मुनिश्रींनी प्रेरणादायी संदेश दिला – “काम असे करा की ओळख निर्माण होईल, पाऊल असे टाका की ठसा उमटेल, जगणे सगळेच जगतात पण आपण असे जगा की इतरांसाठी उदाहरण बनाल.”
गर्ल्स करिअर काउन्सेलिंगमध्ये मुलींना संस्कार विधीचे महत्त्व समजावले गेले. हजारो मुलींनी गुरुंच्या सान्निध्यात संकल्प घेतला की आम्ही परिवार, समाज व राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित राहू, आत्महत्या कधी करणार नाही आणि चुकीचे पाऊल उचलणार नाही.
या कार्यक्रमात मुनिश्रींनी सर्व मुलींना आशीर्वाद दिला. प्रमुख पाहुणे जितेंद्र पापळकर (कमिश्नर) व त्यांचा परिवार उपस्थित होता.  दीपप्रज्वलन
सुप्रिया पापलकर, कंचन देसरडा, निरुपमा बाफना, सुनीता देसरडा प्रमिला दोषी,
सोनम भारूका आशिमा जैस्वाल, श्रुति अमित सोनटक्के यानी केले. समाजातील विविध संस्था, मान्यवर व श्री 1008 भगवान मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर देशमुख नगरच्या मंदिर वतीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here