मनुष्य कार्याने महान बनतो, विचारांनी मोठा होता – आ.डॉ.प्रणामसगरजी महाराज
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – ख.दि.जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे आज दहा दिवसीय पर्युषण महापर्वास आचार्य प्रणामसागरजी गुरâदेव यांच्या संसंघ सानिध्यात मोठया उत्साहात सुरवात झाली.सकाळी ०९ वाजता शांतीनाथ भगवंताच्या मुख्य मंदिरात पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी व समाजातील वरीष्ठ मान्यवरांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करâन दहा दिवसीय पर्युषण पर्वास सुरâवात करण्यात आली. तसेच हिराकाका प्रांगण येथे आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज व विधानासाठी सहकार्य केलेल्या भक्त परिवारातर्फे ध्वजारोन करण्यात आले तसेच शिखर मंदिरावर विभागीय आयुक्त जितेद्र पापळकर व सुप्रिया पापळकर व समाज बांधवांच्या उपिस्थतीत करण्यात आले. यावेळी सचिव प्रकाश अजमेरा,चातुर्मास समिती अध्यक्ष अॅड.अनिल कासलवीाल, विश्श्वस्थ महावीर ठोले, ललीत पाटणी,यतीन ठोले, अशोक गंगवाल, बापु कासलीवाल,शैलेंद्र सेठी,निलेश सेठी, शैलेश पहाडे, उमेश कासलीवाल, प्रमोद ठोले, रितेश ठोले, सुमनबाई पाटणी, जयकुमार कासलीवाल,बाबुलाल पांडे, भरत पापडीवाल, संगीता अजमेरा, जीवन गंगवाल, यांच्यासह समाज बांधवांच्या उपस्थितीत धर्मध्वजरोहन करण्यात आले.
यानंतर आज पर्युषण पर्वाच्या पहिल्या उत्तम,क्षमा धर्माच्या पावन प्रसंगी भगवंताच्या पंचामृत अभिषेक सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचे सौभाग्य शेलेद्रकुमार राजेश मयुर प्रणय किरण सेठी परिवर यांना मिळाला तर महाशांतीधारा करण्याचे सौभाग्य शिखरचंद विलासकुमार विजय शितल सेठी परिवाराला मिळाला.तसेच भगवंताला अर्चना फळ चढविण्याचे सौभाग्य सुभाषचंद विजयकुमार भरतकुमार ठोले परिवार यांना मिळाला, संपुर्ण पंचामृत अभिषेक णमोकार भक्ती मंडळाच्या सुमधुर साग्र संगीतामध्ये संपन्न झाला.बोलीयाचे वाचन पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, अशोक गगवाल आनंद सेठी, महावीर ठोले यांनी केले. यावेळी उपस्थित समाज बांधवांना आचार्य प्रणामसागरजी गुरâदेव यांनी उत्तम क्षमा धर्म या विषयावर उदबोधन करतांना सांगीतले की, आत्म्यात उत्पन्न होणा-या कोधरâपी विकाराला नाहीसे करणे म्हणजे क्षमा गुण प्रगट करणे होय.”क्षमा वीरस्य भुषणं ! ” क्षमा करणे हे वीरपुरâषांचे तसेच साधु संतांचे भुषण आहे.क्षमा हा आत्म्याचा निजधर्म आहे.जीवाची शुध्द परिणती व विश्वप्रेमाचा अमुल्य ठेवा आहे.येथे रागव्देषाला थारा नाहीमनामध्ये राग धरल्यामुळे शत्रु व वैरभाव वाढतो.हे दुर्गतीचे बीज आहे.त्यामुळे वैरभाव सोडुन आत्म्याला शांती देणे मनुष्याचे काम आहे.क्षमा केल्यामुळे मुनुष्याच्या मन,वचन,आणि काया या सर्वाची शुध्दी होते.संतोष,संयम,निराकुलता वगैरे गुणांची वाढ होते.म्हणुन मोठया प्रयत्नाने मनुष्याने सर्व जीवांना क्षमा केली पाहीजे.मनुष्य कार्याने महान बनतो, विचारांनी मोठा होता, असेही त्यांनी शेवटी सांगीतले.
सायंकाळी ५.३० ते ७.३० दरम्यान श्री.हिराचंद कासलीवाल प्रांगण येथे आ.प्रणामसागरजी गुरâदेव यांच्या ससंघ सानिध्यात श्रावक प्रतिक्रमण व ध्यान शिबीर तसेच सायंकाळी ७ वाजता शांतीनाथ भगवंताची आरती व शास्त्र वाचन करण्यात आले. संपुर्ण कार्यकमाला राजाबजारसह परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी समाजबांधवांसह पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अमजेरा, चातुर्मास समिती अध्यक्ष अॅड.अनिल कासलीवाल, महावीर ठोले, ललीत पाटणी, यतीन ठोले, अरâण पाटणी, संतोष सेठी, किरण पहाडे, जितेंद्र पाटणी, निता ठोले, चंदा कासलीवाल, महामंत्री प्रमोद पांडे, रवि सेठी, दिनेश ठोले, विपीन पांडे, अशोक गंगवाल, संजय पहाडे, आशिष सेठी, सपना पापडीवाल, विश्श्वस्थ व कार्यकारणी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहे. दहा दिवसीय पर्युषण पर्वानिमीत्त्त मंदिरावर आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वस्त कार्यकारणी मंडळ वतीने प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.