जगातील पहिला गुरु जर कोणी असेल, तर तो आहे “आई”. – उपाध्याय विरंजन सागर जी महाराज

0
6
 छत्रपती सभाजीनगर  प.पु.आचार्य समाधीसम्राट विरागसारजी महाराज यांचे प्रभावक शिष्य प.पु.पटटाचार्य विशुध्दसागरजी महाराज यांचे आज्ञानुवर्ती शिष्य प.पु.उपाध्याय १०८ विरंजनसागरजी महाराज, मुनिश्री विनीशोधसागरजी महाराज, मुनिश्री विसौम्यसागरजी महाराज, प.पु.क्षुल्लिका विशिलाश्री माताजी यांचा
 चातुर्मास श्री.१००८ मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर देशमुखनगर,शिवाजीनगर येथे सूरू असून विशेष प्रवचनात           विरजणसागर महाराज यानी सागीतलेकी
ब्रह्मांडातील सर्वात गोड आणि प्रिय शब्द जर कुठला असेल, तर तो म्हणजे “आई”. आईने तीर्थंकरांना आणि गुरूंना जन्म दिला आहे. मरणाचे हजार मार्ग आहेत, पण जन्माचा मार्ग एकच आहे — आणि तो म्हणजे आई.
आई ही हजार शिक्षकांच्या बरोबरीची असते. जे शिक्षण हजार शिक्षक देऊ शकत नाहीत, ते एक आई आपल्या मुलांना संस्कारांद्वारे देते. आई हिमालयासारखी भक्कम असते, पण हिमालयासारखी कठोर नसते; आई समुद्रासारखी विशाल असते, पण समुद्रासारखी खारट नसते.
आईच खऱ्या अर्थाने संस्कार देते. जेव्हा औषध काम करत नाही, तेव्हा आईची “दुवा” (आशीर्वाद) काम करते. आई म्हणजे ममता, आई म्हणजे मंदिर, तीर्थ, पूजा-थाळी — आईशिवाय जीवन पोकळ आहे. जगात आईपेक्षा मोठं काहीच नाही. जगातील पहिला गुरु जर कोणी असेल, तर तो आहे “आई”. आईनेच भगवानाची आणि गुरुंची ओळख करून दिली.
जो आईचा सन्मान करतो, तिचे पाय धरतो, त्याचे अशक्य कार्यही शक्य होतात. मुनिश्री म्हणाले, आईच्या महिमेचं वर्णन करणं अशक्य आहे. आपण आईचं आणि वडिलांचं ऋण कधीही फेडू शकत नाही. आई आपले आयुष्य, सेवा, प्रेम सर्व काही आपल्या मुलांसाठी अर्पण करते. वडील दिवसरात्र मेहनत करून फक्त मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कमावतात. स्वतः उपाशी राहूनसुद्धा मुलांसाठी दूध आणतात.
आई-वडिलांची महती सांगणं केवळ शब्दांत शक्य नाही. तरीही मुनिश्रींनी सांगितलं की, जर तुम्हाला आयुष्यात आई-वडिलांचं ऋण थोडं जरी उतरवायचं असेल, तर चार गोष्टी कायम लक्षात ठेवा:
कधीही आईचा राग करू नका, तिचं मन दुखावू नका.
आठवड्यातून एक दिवस तरी आई-वडिलांसोबत बसून भजन करा.
वर्षातून एकदा तरी त्यांना तीर्थयात्रेला न्या.
तुमच्या मोबाईलमध्ये आई-वडिलांचा फोटो ठेवा.
जेव्हा केव्हा दान देता, ते त्यांच्याच नावाने द्या.
मुनिश्रींनी समाजाला उद्देशून सांगितलं की, आई-वडिलं आपल्या मुलांना वसीयत (मिळकती) देऊन जातात, पण संत निरंजन सागरजी तुमच्यासाठी वसीयत नाही, पण “नसीहत” (सल्ला) जरूर देऊन जातील.
या  प्रवचनामध्ये जैन समाजातील वरिष्ठ मंडळी, विविध ग्रुप्स, महिला मंडळ यांची उपस्थिती होती. हजारो भक्तांनी गुरुभक्ती करत धर्मलाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here