छत्रपती सभाजीनगर : जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याण दिवस वेरूळ येथील पहाड मंदिर वर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. परमपूज्य 108 आचार्य विद्यासागर महाराज यांचे परमिशन निर्यापक नियम सागर महाराज वृषभ सागर महाराज सुपाश्व सागर महाराज व अभिनंदन सागर महाराज यांच्या मंगल सानिध्यामध्ये गुरुकुल परिसरातून भगवान पार्श्वनाथची रथयात्रा वेरूळ गावातून काढण्यात आली या यात्रेचे समापन पहाड मंदिर च्या पायथ्या जवळ करण्यात आले. प्रातःसमयी गुरुकुल परिसरामध्ये असणाऱ्या पार्श्वनाथ भगवंताच्या मंदिरामध्ये अभिषेक बोल्या व पूजन करण्यात आले तर पहाड मंदिर वरभगवंताच्या विराजमान पासून तर निर्वाण कल्याणक अभिषेक पूजन इ अनेक बोल्या बोलण्यात आल्या. पार्श्वनाथ भगवंतांना निर्वाण लाडू चढविण्याचा मान चातुर्मास कमिटीचे संयोजक नवीन पाटणी,विजय जितेंद्र पाटणी,
उज्वला पाटील, अनुपमा पाटणी यांना प्राप्त झाला भगवंताच्या अभिषेकाच्या बोल्या मध्ये जलाभिषेक डॉ सुकुमार नवले, जितेंद्र मयूर पाटणी ,तर चतुर्थकलश छाया विजय हनुमंते, महेंद्र भागोजी दगडफोडे, नीरज विश्वेश्वर जैन ,अश्विनी अमोल ठोले, बाहुबली धोंगडे यांना प्राप्त झाला. पूर्ण कलश रूपाने अभिषेक करण्याचा सन्मान भारत यशवंत वायकोस तर पार्श्वनाथ भगवंताची शांतीधारा करण्याचा सन्मान सौ नीना राणी, संजय कुमार, रुचिका, वसुंधरा गाजियाबाद यांना प्राप्त झाला. भगवंताची मंगला आरती सौ रेखा दिनेश गंगवाल यांनी केली तर मंदिरवर ध्वजारोहण नवीन पाटणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील स्वर्गीय देवेंद्र सोनी यांच्या स्मरणार्थ श्रीमती शांती देवी सोनी, रोहित शिल्पा, संस्कार, संस्कृती व सोनी परिवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर जलपान स्वर्गीय धर्मचंद यांचे स्मरणार्थ सुभाषचंद, धीरजकुमार, मयूर, चिराग, चेतन पाटणी परिवार आडगाव वाला यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी प पू 108नियम सागर महाराज, वृषभसागर महाराज अभिनंदन सागर महाराज व सुपार्श्वसागर महाराज यांचे मांगलिक प्रवचन संपन्न झाले. “संसार हे दुःखाचे कारण आहे तर भगवान पार्श्वनाथ यांनी अवलंबलेला त्यागाचा मार्ग हा खऱ्या सुखाचे द्योतक असल्याचे आपल्या मांगलिक प्रवचनातून उपस्थित श्रावकांना उद्बोधन केले”.यावेळी विविध 23 निर्वाण लाडू चढविण्याचा बोली मध्ये प्रेमचंद पाटणी, दिनेश गंगवाल, पूजा बाकलीवाल,रश्मी राणू मोदी अक्षय सोनटक्के जयचंद पाटणी, शाश्वत संघवी,अक्षय बोंद्रे, श्रेणिक गोसावी, लासुर महिला मंडळ, विजयाबाई काला, मयूर बाकलीवाल, निपुण कान्हेड, आदित्य संगवे, नंदा नरखडे, दगडू संगवी, सृजन व्यवहारे दिव्या कुरकुटे, राहुल धोंडालकर, समीर अजमेरा, वसंताबाई कासलीवाल स्वप्नील ठोले व नवकार युवती मंडळ यांना प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी कन्नड चापानेर बोरगाव लासुर छत्रपती संभाजी नगर इत्यादी ठिकाणी होऊन अनेक भाविकांनी गर्दी केली होती कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष दिनेश गंगवाल, डॉ प्रेमचंद पाटणी,नवीन पाटणी, मदनलाल पांडे सुमित ठोले, गौतम ठोले, निर्मलकुमार ठोले महेंद्र दगडफोडे यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित मनीष भैया यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेरूळ येथील श्रावक व श्राविकनी अथक परिश्रम केले.अशी महिती अतुल बादे सुहास मिश्रीकोटकर नरेंद्र अजमेरा पियुष कासलिवाल यानी दिली