छत्रपती संभाजीनगर सह जिल्हयातुन भाविकांची उपस्थिती राहणार
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – श्री.१००८ भगवान पार्श्वनाथ दिंगंबर जैन अतिशय क्षेत्र वेरुळ सालाबादा प्रमाणे दिनांक 31 जूलाई मुकुट सप्तमी निमीत्त भगवान पार्श्वनाथ मोक्षकल्याणक महोत्सव व वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्षेत्राचे अध्यक्ष दिनेश गंगवाल व महामंत्री डॉ.प्रेमचंद पाटणी यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे. यावर्षी परमपूज्य 108 आचार्य विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य निर्यापक नियम सागर महाराज अभिनंदन सागर महाराज सुपाश्वसागर महाराज व ऋषभ सागर महाराज यांच्या मंगलमय सानिध्यामध्ये या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले शहरापासुन ३० कि.मी.अंतरावरील अतिशय क्षेत्र पहाड मंदिर व भगवान पार्श्वनाथ निर्वाण कल्याणक निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम सकाळी ५ ते ७ या वेळेस गुरुकुल मंदिरात प्रार्थना व पुजन तदनंतर सकाळी ८ वाजता गुरुकुल पासुन ते पहाड मंदिरा पर्यंत वार्षिक यात्रा महोत्सवा निमीत्त शोभायात्रा निघणार असुन यावेळी समाज बांधव व मुले प पांढऱ्या वस्त्रांमध्ये या शोभायात्रेत सहभागी असतील तर महिला केशरी साड्या परिधान करून या शोभा यात्रेची शोभा वाढवतीलया शोभा यात्रेचा समापन पहाड मंदिर क्षेत्रावर होईल व. तदनंतर ९ ते १२ पर्यंत पहाड मंदिरावर बोली होऊन भगवंताचा अभिषेक बृहुत शांतीधारा, पुजन, निर्वाण लाडु, ध्वजारोहन करण्यात येईल. यावेळी उपस्थित समाज बांधवांना छत्रपती संभाजीनगर येथील स्व.देवेंद्रकुमारजी सोनी यांच्या स्मरणार्थ श्रीमती.शांतीदेवी सोनी, रोहित,शिल्पा,संस्कार,संस्कृती सोंनी परिवार यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. स्व.धरमचंदजी यांच्या स्मरणार्थ सुभाषचंद धिरजकुमार मयुर चिराग चेतन पाटणी परिवार अडगांववाला लोणवाडी बालाजीनगर यांच्या वतीने जलपान देण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामाईक व आरतीने यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. जैनांचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथांची अर्धपदमासन १६ फिट अशी अत्यंत प्राचीन मनोज्ञ प्रतिमा आहे. या मुर्तीचे दर्शन घेतल्याने मनुष्याला सुख,शांती मिळते अशी या मंदिराची ख्याती आहे. तरी समाज बांधवांनी वरील कार्यक्रमास मोठया सख्येने उपस्थित रहावे असे आहवान अध्यक्ष दिनेश गंगवाल, महामंत्री डॉ.प्रेमचंद पाटणी, कोषाध्यक्ष सुमित ठोले, सहसचिव गौतमचंद ठोले, शाळा समिती अध्यक्ष मदनलाल पांडे, निर्मल कुमार ठोले मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर व विश्वस्थ मंडळाने केले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक अतुल बांदे,नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल, सुहास मिश्री कोटकर यांनी एका पत्रकाव्दारे दिली.















