गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधत महासहस्रनाम मंत्रोच्चारण जप अनुष्ठानाचे आयोजन केले होते. यामध्ये ६१० भाविक सहभागी झाले. प्रत्येकाने ११०० लवंगा या अनुष्ठानात अर्पण केल्या. देशमुखनगरात पहिल्यांदाच होत असलेल्या चातुर्मास सोहळ्यातील हा महत्त्वाचा विधी ठरला. यामध्ये सर्व भाविकांनी मिळून ६ लाख १४ हजार ८८० लवंगा अर्पण केल्या. पहलगाम आणि विमान अपघातात निष्पापांचे बळी गेले. यासाठी विश्वशांतीच्या मनोकामनेने हा जपसोहळा झाला.
उपाध्याय विरंजनसागर महाराज पहिल्यांदाच महाराष्ट्रात चातुर्मासासाठी आले आहेत. मंदिराजवळील मल्लिनाथ देशना सभामंडपात हा धार्मिक सोहळा पार पडला यावेळी संस्कारच माणसाला भगवान बनवतो, असं उपाध्याय श्री विरंजन सागर महाराज मधील श्री 1008 मल्लिनाथ देशना मंडप, देशमुखनगरात गुरुपुष्यमृत कार्यक्रम प्रसंगी सांगितलं. आज मुनि श्रींनी मंत्र साधना केली आणि सांगितलं की एक पाषाणसुद्धा सूर्य मंत्र दिल्यास भगवान होतो, एक मातीचा कलशही पूजनीय बनतो जेव्हा त्याला योग्य संस्कार दिले जातात.
मग माणसात जर योग्य संस्कार दिले गेले, तर तोही भगवानासारखा बनू शकतो. फक्त आवश्यक आहे एक योग्य गुरुची. एक खरा गुरु आणि चांगली संगत मिळाली, तर माणसाच्या आत उत्तम गुण येऊ शकतात आणि तोही खरा माणूस बनून देशाचं नाव उज्वल करू शकतो.
आज देशाला खऱ्या माणसाची गरज आहे, जो मानव धर्माची ओळख करून देईल आणि देशाचं भवितव्य घडवेल. मुनि श्रींनी उदाहरण देताना सांगितलं की, पावसाची एक थेंब जेव्हा पडते, तेव्हा ती चिखलात पडली तर घाण होते, गहण्यावर पडली तर गोड वाटते आणि जर ती शिंपल्यात पडली तर मोती बनते.
तसंच माणूसही जशी संगत मिळते, तसा बनतो. म्हणूनच संगत योग्य असली पाहिजे. आज गुरु पुष्ययोग नक्षत्रावर विशेष मंत्र साधना करण्यात आली आणि भक्तांना सुख-शांतीचा मार्ग दाखवण्यात आला. हजारो भक्तांनी एकत्र येऊन मंत्र साधना केली आणि सर्व भक्त मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या पादप्रक्षालनाने झाली. समाजातील प्रतिष्ठित गणमान्य सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी देशमुख नगर अरीहतनगर बालाजी नगर शीवाजीनगर राजाबाजार वेदांत नगर सेठीनगर आदी ठीकानाहून भाविक हजर होत