श्री क्षेत्र जैनगिरी (जटवाडा) येथे अमावस्या निमीत्त्त पंचामृत अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन.
आचार्य सिद्धांत सागर महाराज ससंघ सानिध्यात आयोजन
छत्रपती सभाजिनगर प्रतिनिधी – शहरापासुन १२ कि.मी.अंतराव असलेल्या हजारो जैन बांधवांचे श्रध्दास्थानअसलेले श्री.१००८ संकटहर पार्श्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी जटवाडा येथे दिनांक 15 जुन सोमवार 2026 सकाळी १० वाजता मुलनायक श्री.संकटहर पार्श्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात करण्यात येणार आहे. .आचार्य सिद्धांत सागर महाराज ससंघ सानिध्य प्राप्त होनार आहे यावेळी आचार्यश्री चे प्रवचन व पादपक्षालन होनार आहे यावेळी उपस्थित समाज बांधवांना ११ ते २ दरम्यान श्रीमती शंकुतलाबाई रमनलालजी बाकलीवाल पाचोडवाला यांचा प्रेरनेने श्रीमती रीनादेवी शीतलकुमारजी प्रवेश नमन बाकलीवाल परीवार पाचोडवाला व छाबडा परीवार छत्रपती संभाजीनगर याचा
, वतीने महाप्रसाद दिला जाणार आहे.
अमावस्या निमीत्त्त सकाळी १० वाजता मुलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक नित्यनियम पुजा होवुन भगवंताची आरतीही करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाप्रसादी परिवार व जटवाडा क्षेत्राचे विश्वस्त मंडळातर्फे केले आहे
श्री.क्षेत्र जैनगिरी येथे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येत असतो तसेच यावेळी भाविकांकडुन महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.












