नवरात्रोत्सव महोत्सवात रुद्र होम व सुदर्शन होम अत्यंत उत्साहात संपन्न!

0
38
छत्रपती संभाजीनगर:
‘द आर्ट ऑफ लिविंग’ (वैदिक धर्म संस्थान) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्रिलोक सिंह जबिंदा लॉन्स, गुरुकुल शाळेच्या मागे, शाहनूरवाडी येथे सुरू असलेल्या भव्य नवरात्रोत्सव व होम महोत्सवात आज आध्यात्मिक उत्साहाची रेलचेल पाहायला मिळाली.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६) सकाळी रुद्र पूजा आणि रुद्र होम अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने व वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात संपन्न झाले.
यापूर्वी काल सायंकाळी (१६ ऑक्टोबर) पार पडलेला ‘सुदर्शन होम’ अतिशय हर्षोल्लासात आणि प्रचंड ऊर्जेसह संपन्न झाला. सुदर्शन होमानंतर चिमुकल्या बालकांनी भरतनाट्यम द्वारे गणेश स्तुति सादर करून भगवंताला अत्यंत भावपूर्ण अशी नृत्य सेवा अर्पण केली. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या प्रत्येक होमामध्ये जवळपास ४०० ते ५०० लोकांच्या उपस्थितीत भाविकांनी साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्तींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या संपूर्ण महोत्सवात आणि प्रत्येक होमामध्ये लॉन्सचे मालक त्रिलोक सिंह जबिंदाजी हे आवर्जून व प्रामुख्याने उपस्थित राहत आहेत. तसेच, हा संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनिल देशमुख, देवेन लड्डा, अक्षय वैद्य आणि प्रवीणजी पांडे  यांच्यासह आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक व स्वयंसेवकांची एक मोठी टीम अहोरात्र, निष्ठेने परिश्रम घेत आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here